जवळील प्रेक्षणीय स्थळे


श्री भीमाशंकर मंदिर कडे जाण्यासाठी बस स्थानका पासून 1 कीमी अंतर आहे . मंदिराकडे जाण्यासाठी 200पायऱ्या उतरून जावे लागते . मंदिरात आल्यावर सभामंडपात भगवान विष्णू च्या दशावतारामधील एक अवतार कूर्म अवतार म्हणजेच कासव आहे . शिवलिंगाच्या समोर नंदी विराजमान आहे . मंदिरात प्रवेश करताना डावीकडे गणपतीची शेंदूर चर्चित मूर्ती आहे व उजवी कडे देवाचे रक्षक श्री कालभैरव यांची मूर्ती आहे . गाभाऱ्यात गेल्यावर पवित्र शिवलिंग विराजमान आहे . शिवलिंगामध्ये एक उभा छेद आहे . यामध्ये एककीकडे शिव एका बाजूस शक्ती असे दोन भाग आहेत . गाभार्यामध्ये समोरील बाजूस पार्वती देवीची मूर्ती आहे .
मंदिर रचना -ह्या मंदिराचा जीर्णोद्धार 1212 मध्ये झाला होता . मंदिराच्या रचने मध्ये प्रामुख्याने दोन प्रकारात बांधकाम झालेले दिसून येते . मंदिराच्या पाया पासून छता पर्यंत चे काम चुना व माती न वापरता झालेले आहे , तर कळसाचे काम हेमाड पंथी आहे . तसेच गाभाऱ्याचे प्रवेश द्वार हेमाडपंथी रचनेमधील आहे . मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीवर श्री कृष्णाची मूर्ती आहे . पश्चिमेस हमुमाना ची मूर्ती , व उत्तरेस श्री महिषासुर मर्दिनी ची मूर्ती आहे . मंदिराच्या भिंती वर ऋषी मुनि यांच्या मूर्ती कोरल्या आहेत . शिखर व कळसावर वेगवेगळ्या मूर्ती आहेत . मंदिराचे शिखर आतुन पूर्ण पोकळ आहे . मंदिराच्या समोरील सभामंडपाचे काम 1962 साली करण्यात आले आहे . सभामंडपाच्या समोर शनी चे मंदिर आहे . शनी मंदिराला लागून दगडी दीपमाळ आहे